राजस्थान, २३ ऑगस्ट २०२०: राजस्थानचे राज्य सरकार बीयर कंपनी आणि ठेकेदारांना नफा पोचवण्यासाठी कोरोना काळात एक्सपायर झालेल्या बीयर विकण्याच्या तयारीत आहे. वित्त आणि महशूल सचिव औंकारमल राजाेतिया यांनी १७ ऑगस्टला लेखी आदेशात लिहले आहे की, बीयर चे एक्सपायरी डेट ६ महिन्यानवरून ९ महिने करण्यात येत आहे. राज्यात ३१ मार्चच्या आधी बनवण्यात आलेले बियरचे ४ लाख बॉक्स साठा पडून आहे, जे या आदेशावरून विकण्यायोग्य होतील. याआधी दारू फॅक्टरी आणि लाइसेंस दुकानदाराला सहा महिने जुन्या बियरला नष्ट करण्याचे प्रावधान होते.
बियर बनवणाऱ्या कंपनीचे म्हणणे होते की, बियर बनवण्यापासून फक्त ६ महिने पिण्या योग्य असते, मग सरकार कोणत्या आधारे खराब झालेल्या बियरला आणखीन ३ महिने वाढवत आहे आणि जर या असल्या बियर प्यायल्यामुळे कोणाचे आरोग्य धोक्यात आले तर त्याला जबाबाबदार कोण? बियर वेळेअनुसर खराब होत जाते.
म्हणून त्याला फ्रिज मध्ये ठेवण्यात येते. अशा बियरची एक्सपायरी डेट वाढवणे खूप चिंताजनक आहे, असे एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आदेशात असेही म्हंटले आहे की, या बियरमुळे जर कोणत्याही घटना घडली तर त्यासाठी बियर कंपनी आणि सप्लायर कारणीभूत असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: संदीप राऊत