पुणे: राज्यात येत्या बुधवार (दि.६)पर्यत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तविली आहे.
लक्षद्वीप आणि लगतच्या अरबी समुद्रावर ‘महा’हे चक्रीवादळ तयार झाले आहे. गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. येत्या रविवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे