कोरोना योद्धांना राजेश टोपेंनी दिली सलामी

3

नाशिक, दि.१४ मे २०२०: मालेगाव इथं कार्यरत असलेल्या जालना, अमरावती येथील लागण झालेल्या कोरोना बाधितांवर नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार सुरू होते. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोना योद्धा म्हणून टोपे यांनी या जवानांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तर पोलीस बँडच्या पथकाने यांना सलामी दिली.

वाढत्या कोरोना संशयित रुग्णाच्या तपासणीसाठी देशातील सर्वोत्तम NIV लॅब मध्ये ३०० टेस्टचा राखीव कोटा हा मालेगावसाठी राखीव ठेवण्यात आला आहे, तर येत्या ३ दिवसात धुळे येथील आटोमॅटिक लॅब देखील कार्यान्वित होणार आहे. धुळे येथेही दररोज ४५९ टेस्टिंग होणार दोन्ही लॅब मिळून नाशिक जिल्ह्यातील दिवसाला ७५० अहवाल प्रशासनाला प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शिवाय मालेगाव इथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी खाजगी डॉक्टर लावण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राज्यात रिक्त १७,००० वैद्यकीय क्षेत्रातील पदे लवकर भरणार असून , त्यासाठी कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. पुढील ८ दिवसात सचिवांना सांगून भरतीप्रक्रियाची जबाबदारी पूर्ण करणार असल्याचेही टोपे यांनी नमूद केले आहे.

जे अधिकारी पुढे येऊन काम करत आहे, त्यांनाच अपघाताने कोरोनाची लागण होत असल्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असून सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.

कोरोनाची लागण टाळण्यासाठी प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याने मास्क, स्वच्छता, सामाजिक अंतर ठेवणं अपेक्षित असून अभ्यासपूर्वक परिस्थिती हाताळावी अशी अपेक्षा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा