राजगुरूनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व उद्योजक दत्तात्रय (बाळासाहेब) हरिभाऊ सांडभोर यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरुनगर क्र १ शाळेत सात स्मार्ट टीव्ही संच प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व माजी उपसभापती हरिभाऊ यांच्या उपस्थितीत हे संच वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब राजगुरूनगरच्या वतीने पुढील दोन ते तीन वर्षात खेड तालुक्यातील अनेक शाळा डिजिटल करण्याचा उद्देश समोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांना स्मार्ट टीव्ही संच वाटप करण्यात येत आहे. आत्तापर्यंत अनेक शाळांना हे संच वाटप करून शाळा डिजिटल करण्यात च्या दिशेने वाटचाल करत आहे. यानिमित्ताने राजगुरूनगर शाळा क्रमांक १ येथे बाळासाहेब सांडभोर यांच्या सौजन्याने सात स्मार्ट टीव्ही संच वाटप करून संपूर्ण शाळा डिजिटलायझेशन करण्यात आली आहे. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे, माजी उपसभापती पंचायत समिती माजी उपसभापती हरिभाऊ शेठ सांडभोर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व उद्योजक दत्तात्रय (बाळासाहेब) हरिभाऊ सांडभोर, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे , उपसभापती ज्योती आरगडे , राजगुरूनगर नगरपरिषद नगराध्यक्ष शिवाजी मांदळे , उपनगराध्यक्षा वैशाली बारणे ,पंचायत समिती सदस्य सुनीता सांडभोर, नगरसेवक स्नेहलता गुंडाळ , राहुल आढारी , सारिका घुमटकर, गटशिक्षणअधिकारी संजय नाईकडे , विस्तार अधिकारी संजय टेंबे , जीवन कोकणे, बाळकृष्ण कळमकर, रोहिदास रामाने, केंद्रप्रमुख गजानन परदेशी व रोटरीचे सर्व सदस्य जिल्हा परिषद राजगुरुनगर नंबर 1 चे सर्व पालक, विद्यार्थी, रोटरीचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू उंबरे व सदस्य भाऊसाहेब वायदंडे, मच्छिंद्र भालेकर, मंगेश गुंडाळ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कांचन वायाळ , द. मा.पिंगळे, रवींद्र मावळे, अनिल साकोरे , जयसिंग उकिरडे, जयश्री घुमटकर , गीता सांगडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब राजगुरूनगर अध्यक्ष नरेश हेडा , सूत्रसंचालन राष्ट्रीय पुरस्कार विजेते द. मा. पिंगळे यांनी तर सुधीर मांदळे यांनी आभार मानले.