राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात शरद पवार यांच्या नावाने एक हजार बेडचं कोव्हिड सेंटर उभारलं

अहमदनगर, १८ ऑगस्ट २०२० : अहमदनगर जिल्ह्यातल्या टाकळी ढोकेश्वर- कर्जुले हद्दीवर, मातोश्री शैक्षणिक संकुलाच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात शरद पवार यांच्या नावाने १ हजार बेडचं कोव्हिड सेंटर उभारण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्याचं लोकार्पण केलं. यावेळी बोलताना टोपे यांनी, आगामी काही महिन्यात युके आणि सिरम संस्थेच्या वतीनं तयार करण्यात येणारी कोविडची लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.

सुपा औद्योगिक वसाहत तसेच नगर-पुणे महामार्गावर सुपा येथे विशेष बाब म्हणुन ट्रॉमा सेंटर सुरू करण्यासाठी लवकरच मंजुरी देवू असं आश्वासनही टोपे यांनी यावेळी दिले. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत कोव्हिड हॉस्पिटलचे टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. टाटा ट्रस्टच्यावतीने १० कोटी रुपये खर्चून हे हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी इकरा युनानी महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरमधून गेल्या एक महिन्याच्या कालावधीत २५६ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले, असून सध्या ६४ रुग्ण उपचार घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा