राजकारणातला “बापमाणुस”

32

                                              

मुंबई: आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हेच केंद्रबिंदू असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ते सर्व विरोधकांना अक्षरश: पुरून उरले. आपणच महाराष्ट्राचे चाणक्य असल्याचे त्यांनी पुन्हा एकवार सिद्ध केले.
अँग्री ओल्ड यंग मॅन इन द वॉर शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक एकतर्फी वाटत असताना पवारांनी निवडणूक फक्त एकहाती फिरवलीच नाही. ती जिंकलीसुद्धा. राष्ट्रवादीच्या जागा लक्षणीय वाढल्याच. पण निवडणुकीच्या निकालानंतर झालेला पेच सर्वाधिक खुबीने यशस्वीपणे हाताळला तो पवारांनीच.
बारामतीच्या या “बापमाणसा” ने डझनभर आव्हाने लिलया परतावून लावली.यासाठी त्यांनी उत्तम नियोजन केले

१. चाणक्यनीतीचा अचूक वापर
२. भाजप, मोदी-शाहांना पवारांचा ‘शह’
३. अजित पवारांचं बंड मोडून काढलं
४. कुटुंबातील, राष्ट्रवादीतील फूट टाळली
५. महाविकासआघाडीचे शिल्पकार ठरले पवार
६. सोनिया गांधींची मनधरणी करण्यात यश
७. बेरजेचं राजकारण करण्यात माहीर असलेल्या भाजपला महाविकासआघाडीचं संघटन दाखवून दिलं.
८. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची मोट बांधली
९. दोन टोकांच्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आणून दाखवण्याची किमया पवारांची
१०. १६२ आमदारांचं महाशक्तिप्रदर्शन घडवले.
११. संभ्रमित आमदारांना विश्वास दिला
१२. कायदेशीर डावपेचात भाजप नेतृत्वावर कुरघोडी केली

या निवडणुकीने न भूतो न भविष्यती असे क्षण अनुभवले. पण त्यामध्ये उठून दिसले ते लढवय्ये पण तितकेच संयमी पवार. ‘ईडी’च्या गुन्ह्यापासून ते पुतण्याने घर फोडण्यापर्यंत अनेक धक्के पवारांनी पचवले. पण चेहऱ्यावरची रेष हलली नाही, किंवा कपाळावर आठी पडली नाही. साम, दाम, दंड भेदाला मोडून काढत पवार जिंकले.
वयाच्या ७९ व्या वर्षी हात पाय गुडघे दुखण्याच्या या वयात या माणसाने अख्खा अग्निपथ एकट्याने पार केला. आज महाविकासआघाडीचे सरकार महाराष्ट्रात येते आहे.त्याचे खरे शिल्पकार शरद पवार हेच आहेत. असे म्हणावे लागेल. सत्ताधारी असणाऱ्या भाजपला अधिक संख्याबळ असूनही विरोधात बसावे लागत आहे ते सुध्दा शरद पवार यांच्यामुळेच. वयाच्या ७९व्या वर्षी या माणसाने अख्ख्या महाराष्ट्र पिंजून काढला.
तरुणासारख्या न थकता न डगमगता सभा घेतल्या. अगदी पावसातही त्यांनी सभा घेतली. आणि त्याचच श्रेय त्यांना मिळालं आहे.

                                                                                   – प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा