राजकीय फायद्यासाठी निष्पाप झाडांची कत्तल !

31

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल, एसपी कॉलेजच्या आवारातील झाडांवर कुऱ्हाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी पुण्यात प्रचारसभा पार पडणार आहे.त्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदींची ही सभा पार पडणार आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार असून त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी कॉलेजच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. परिसरातील अनेक मोठी झाडे सोमवारी रात्री कापण्यात आली आहेत. सभेत अडथळा ठरणारी सर्व झाडे कापण्यात आली असून जमिनीचं सपाटीकरण करण्यात आलं आहे.

एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास १५ ते १६ झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान आयोजकांनी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव झाडं कापण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

विविध स्तरांमधून या गोष्टीला विरोध दर्शविला जात आहे