गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा राजकुमार रावचा “लुडो” लूक व्हायरल

राजकुमार रावचा “लुडो” लूक व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या जजमेंटल है क्या..चित्रपटानंतर राजकुमार राव लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.
राव त्याच्या आगामी चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे.
या चित्रपटात राजकुमार एका मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. मुलीच्या गेटअपमधील राजकुमारला ओळखणंही कठीण जात आहे. या चित्रपटाचं नाव “लुडो” असून अनुराग बासूनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लुडो चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. ज्यात तो मुलीच्या गेटअपमध्ये खूप वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.त्यामुळे प्रेक्षकांना त्याला या लूकमध्ये पाहण्याची वाट पाहत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version