उद्धव ठाकरेंना फोन वर राजनाथ सिंह म्हणाले- ‘अस्सलाम वालेकुम’! काय आहे प्रकरण?

मुंबईत, 13 जुलै 2022: राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतरच महाराष्ट्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल, असं मानलं जात आहे. पण त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत स्वत: आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यातील फोनवरील संभाषणाची माहिती दिली. यानंतर येथील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडालीय.

प्रत्यक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारीही शिवसेनेच्या जुन्या-नव्या आमदारांची आवश्यक बैठक बोलावण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी सांगितलं की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना फोन केला आणि ‘अस्सलाम वालेकुम’ने संभाषण सुरू केलं. उद्धव म्हणाले की, राजनाथ यांच्या या प्रकरणावर त्यांनी आक्षेप घेतला तेव्हा संरक्षणमंत्र्यांनी ‘जय श्री राम’ म्हणत गोष्टी पुढं नेल्या.

एनडीएकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी राजनाथ सिंह यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राजनाथ देशभरातील पक्षांच्या प्रमुखांशी बोलून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत.

दुसरीकडं, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या या कथेबद्दल सांगितलं की, राजनाथ सिंह मेहबुबा मुफ्तींना फोन करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चुकून फोन मातोश्रीमध्ये लागला. तर दुसरीकडे पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव यांच्या कथेवर भाजपच्या वतीने वक्तव्य केले आहे. या किस्साबाबत मी राजनाथ सिंह यांच्याशी बोललो, असे ते म्हणाले. असं काहीही बोलले नाही, हे खोटे असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी असं बोलणं थांबवावं. मात्र, यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव यांनी द्रौपदी मुर्मूला दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा