रजनीकांतच्या “दरबार”ला पहिल्याच दिवशी कोटीचं ओपनिंग

मुंबई : सुपरस्टार रजनीकांतचा ‘दरबार’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत यांचे सिनेमे म्हणजे चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. मुरूगादॉस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून ‘दरबार’ सिनेमा ९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात रजनीकांत यांनी पोलिसाची भूमिका साकारत असून या पोलिसाने मुंबई सारख्या शहरातील ड्रग्सच रॅकेट जाळण्याचं मिशन हाती घेतलं आहे. अशी सिनेमाची कथा आहे.

९ जानेवारी रोजी हा सिनेमा जवळपास ४००० स्क्रिनवर शेअर झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांना आवडला आहे. ओपनिंग डेच्या दिवशी सिनेमाने चेन्नईत तब्बल २.२७ करोड इतक्या रुपयांची कमाई केली आहे. भारतासह हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे.
मुंबईतील एका चित्रपटगृहात रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष करत दरबार चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला.
मुंबईतील सायन परिसरात असलेल्या एका चित्रपटगृहात रजनीकांत यांच्या चाहत्यांनी जल्लोष करत दरबार चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला. रजनीकांत यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. या निमित्तानं दरबार या चित्रपटाचा ७० फुटी पोस्टर तयार करण्यात आला. या पोस्टरला दुग्धाभिषेक करत चाहत्यांनी जल्लोष केला असल्याचे पहायला मिळाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा