गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

इंदापूर, २९ सप्टेंबर २०२० : इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली.या नूतन कार्यकारिणीचा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.29) सत्कार केला.यावेळी इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश मिसाळ, कार्याध्यक्ष देवा राखुंडे, प्रसिद्धी प्रमुख विजय शिंदे, संघटक शिवाजी पवार यांचा यथोचित सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.

यावेळी एबीपी माझाचे रिपोर्टर राहुल ढवळे, झी-२४ तासचे रिपोर्टर जावेद मुलाणी, लक्ष्मण सांगवे आदी उपस्थित होते. यावेळी राजवर्धन पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी विविध विषयावर संवाद साधला. पत्रकारांचे योगदान, सामाजिक प्रश्न, वास्तव परिस्थिती, राजकीय घडामोडी यावर चर्चा झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.

error: Content is protected !!
Exit mobile version