राजू शेट्टी शेपटीला चिंध्या बांधून कार्यकर्त्यांना जाळत आहेत, सदाभाऊ खोत यांची टीका

मुंबई, १० ऑगस्ट २०२३ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि विदर्भातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यात काही दिवसापासून बिनसले आहे. रविकांत तुपकर यांनी उघड भूमिका घेत राजू शेट्टी यांना विरोध दर्शवला होता. तर संघटनेची बैठक बोलावून शिस्तभंग समितीसमोर आपले म्हणणे मांडण्याकरता रविकांत तुपकर यांना काही दिवसापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. रविकांत तुपकर या बैठकीला हजर राहिले नाहीत. परंतु मी संघटनेत असून, संघटना आणि चळवळीच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलताना त्यांनी जाहीर केले होते.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कलह सुरू असल्याचे दिसत आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना फुटण्याच्या वाटेवर आहे. याच्या आधी अनेक नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जय महाराष्ट्र करत संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर नाराजी व्यक्त टीका केली होती. तसेच आपला कोणाशीही वाद नाही. तर नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि भूमिकेवर आक्षेप असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर यावरून आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून राजू शेट्टी यांना आम्ही राज्यभर नेले. हे नेतृत्व वाढले पाहीजे, सत्तेच्या पटलावर आमचा माणूस हनुमान बनून गेला याचा अभिमान वाटायचा. पण नंतर कळाले की हा हनुमान नाही माकड आहे. जे शेपटीला चिंध्या बांधून कार्यकर्त्यांना जाळत आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा