नवी दिल्ली, २३ जुलै २०२१: मान्सूनच्या सत्रादरम्यान संसदेच्या दोन्ही अधिवेशनात गदारोळ सुरूच आहे. गुरुवारी, विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस हेरगिरी घोटाळ्यासह अनेक विषयांवर निदर्शने केली. पेगासस प्रकरणावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना आपलं बोलणं मांडता आलं नाही आणि त्यांना आपल्या भाषणाचा कालावधीत देखील कमी करावा लागला. एवढेच नाही तर हे प्रकरण ओढा तानी पर्यंत जाऊन पोहोचलं.
आयटी मंत्री जेव्हा पेगासस विषयावर आपले मत मांडण्यासाठी उभे राहिले, तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांनी आयटी मंत्र्यांच्या हातातील पत्रक काढून ते हवेत फोडले. यादरम्यान, गोंधळ सुरू असताना आयटी मंत्री सतत बोलत राहिले, परंतु या गोंधळात ते आपलं म्हणणं पूर्णपणे मांडू शकले नाही. यानंतर भाजप आणि तृणमूलच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी मार्शल बोलावले गेले.
त्यानंतर राज्यसभा तहकूब करण्यात आली. राज्य सभा तहकूब करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी सकाळी कामकाज सुरू झाले तेव्हा सुरू असलेल्या गोंधळामुळे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. दुसरीकडे लोकसभेतील गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आणि नंतर उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
संसदेत न शोभणारे वर्तन- भाजप
तृणमूल खासदारांच्या वर्तनावर माध्यमांशी बोलताना भाजपचे खासदार स्वपन दासगुप्ता म्हणाले, संसदेत अशोभनीय वागणूक झाली आहे. आपल्या वक्तव्या दरम्यान मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुमचा हक्क आहे, परंतु वादविवादाऐवजी संसदेत काय घडले हा एक प्रकारचा उपद्रव आहे? हे सर्व नियमांच्या विरोधात आहे. याचा पूर्ण निषेध केला पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे