राज्याच्या राजकारणात होणार राजकीय भूकंप?

मुंबई: राज्याच्या राजकारणाचा तिढा अद्याप “जैसे थे” च आहे. आज दिवसभराच्या घडामोडीतून सत्ता स्थापनेसाठी अनेक हालचालींना वेग आला आहे. कारण पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरले आहेत. काँग्रेसचे सगळे दिग्गज शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यातून शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता यातून वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आता निर्माण होऊ लागली आहे.

आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.त्यातून सत्ता स्थापनेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यातून पत्रकार परिषदेत शिवसेनेवर अनेक आरोप करण्यात आले.परंतु शिवसेनेच्या वतीने त्यांच्या या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले. त्यामुळे महायुतीचे सरकार होण्याविषयीच्या सर्व आशा जवळपास मावळल्या आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा