नवी दिल्ली : एनआरसी, सीएए व एनपीआर या मुद्द्यांवरुन देशात अशांतता व अस्वस्थता आहे. अनेक लोक या मुद्यांविरोधात एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार बॅकफुटवर आल्याचे दिसत आहे. असे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
याबाबाबत रविशंकर प्रसाद म्हणाले की, राज्यांशी चर्चा केल्याशिवाय एनआरसी लागू केला जाणार नाही. त्याचबरोबर एनपीआरसाठी गोळा केलेल्या माहितीचा वापर एनआरसीसाठी केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
अनेक राज्यांनी एनआरसीविषयी निरुत्साह दाखवला आहे. एनडीएतील महत्वाचा घटक पक्ष असणारे जदयूचे नेते व मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही एनआरसी राज्यात लागू करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, एनआरसीविषयी केंद्र सरकारमध्ये गोंधळाची स्थिती आहे. पंतप्रधान मोदी यांनी एनआरसीविषयी काहीही चर्चा न झाल्याचे म्हटले होते, तर गृहमंत्री अमित शहा यांनी देशभर एनआरसी लागू केली जाईल, असे म्हटले होते.