राज्यात गेल्या २४ तासात ४,७९७ नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

पुणे, १६ ऑगस्ट २०२१ : राज्यात काल ४,७९७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन ३,७१० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६१,८९,९३३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६४,२१९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.८३% झाले आहे.

तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

पुण्यात दिवसभरात नवे २१८ कोरोनाबाधित!

पुणे शहरात काल नव्याने २१८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९० हजार ४४६ इतकी झाली आहे. शहरातील २४४ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७९ हजार ५०१ झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात ८ हजार ८७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ०४ हजार ७३९ इतकी झाली आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात २६७ रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासात २६७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३०८ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत एकूण रुग्ण बरे झालेल्या संख्या ७ लाख १८ हजार ८३ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. सध्या मुंबईत २ हजार ८३४ सक्रिय रुग्ण आहेत. करोना रुग्ण दुप्पटीचा वेग १,९२१ दिवसांवर पोहोचला आहे. ८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका होता.

 


न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा