राज्यात पहिल्यांदाच वाळू माफियांवर लागला मोका

34

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आदेश;राज्यातील पहिली कारवाई

बारामती : बऱ्याचवेळा वाळू माफियांकडून महसूल अधिकारी, कर्मचारी व पोलिसांवर हल्ले होतात. अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी मोका कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला तीन महिन्यापूर्वी दिला होता.
त्यानंतर बारामती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तीन वाळू माफियांवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे.
    बारामती उपविभागीय पोलिसांनी वाळू माफियांवर लक्ष केंद्रीत केले आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत हनुमंत मोहन शेळके (वय ३५), गणेश मोहन शेळके (वय ३२) रा. भिगवण स्टेशन ता.इंदापूर जिल्हा पुणे, सुनील जालींदर काळे (वय ३२) रा. देशमुखवस्ती ता. कर्जत जिल्हा अहमदनगर हे तिघे भीमा नदी  क्षेत्रामधील बेकायदा वाळू उपसा करून वाहतूक घेऊन जात असताना पोलिसांनी तपास नाक्यावर त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असताना गाड्या घेऊन गेले. पोलिसांनी त्यांचा पाटलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

हे तिघे भिमा, नीरा व अन्य नदींच्या पात्रातील म्हणजेच पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हद्दीत दहशत निर्माण करून स्वत; आर्थिक फायद्यासाठी वाळूची तस्करी करणे, सरकारी कामात अडथळा करणे, जबरी चोरी करणे असे विविध गुन्हे  भिगवण, दौंड, करमाळा पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
या तिघांवर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३५३/१९ कलम ३५३, ३६३, ३४१, ३७९,५०४,५०६ सह गौण खनिज अधिनियम कलम २१(४) अन्वये. तसेच महाराष्ट्र संघटत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (i) ii ),३४) या मोक्का कायद्यातर्गत कार्यवाही करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मान्यता दिली असल्याने या सर्व आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती  उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशासनाने दिली आहे.

चौकट
बारामती उपविभागात ९३ जणांवर मोक्का
बारामती इंदापूर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, खंडणी, घरफडी, चोरी, खून, वाळू माफिया असे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या विरुद्ध कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आतापर्यंत १५ प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मान्यता दिली असल्याने बारामती उपविभागात ९३ जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तर यातील ८७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोट…
उपविभागातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, ग्रामीण पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार काम करण्यात येते. वाळू माफीयांना मोका लावल्यामुळे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हेच सिद्ध झाले आहे. या कारवाईमुळे वाळू माफीयांना वचक बसेल असा विश्वास आहे.
– नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती.
——-
मोका कारवाई करण्यात टोळ्या 
 
धन्या कांबळे, भोरया टोळी बेबट्या भोसले, दत्तात्रय अडागळे (बॉण्ड) 
डाबर टोळी सचिन पडळकर, दिनेश वायसे, दिलीप उर्फ भावड्या जाधव, सोमा राऊत, दीपक धरणे, साधू पवार,  निरंजन पवार, सूरज मुंडे, संतोष जगताप, हनुमंत शेळके