राज्यातील निम्म्या जिल्ह्यात मिळालाय भोपळा!

मुंबई, २८ ऑक्टोबर: जे दोन पक्ष पुढील पाच वर्ष राज्यात सरकार चालवणार आहेत. त्यांना राज्यातील निम्म्या जिल्ह्यात एकही आमदार निवडूण आणता आला नाही.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा युतीच्या हातात सत्ता दिली. निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी जो दावा केला होता तो काही निकालात दिसला नाही. आता निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात नेमका सत्तेचा वाटा कसा असावा यावरून जुंपली आहे. पण जे दोन पक्ष पुढील पाच वर्ष राज्यात सरकार चालवणार आहेत. त्यांना राज्यातील निम्म्या जिल्ह्यात एकही आमदार निवडूण आणता आला नाही. महायुतीमधील सर्वात मोठे पक्ष असलेल्या भाजपला तीन तर शिवसेनेला १३ जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. अर्थात ही अवस्था फक्त सत्ताधाऱ्यांची नाही तर विरोधकांना देखील अशीच काहीशी अवस्था आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा