राज्यातल्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ७० अर्ज

मुंबई: सध्या लॉक डाउन मुळे कोणालाही बाहेर पडता येत नाहीये. काही लोकांच्या मूर्खपणा मुळे जे विणकामी बाहेर पडत असतात त्यामुळे जे खराज अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडतात त्यांना ही बाहेर पडणे अवघड झाले आहे. सरकार अतिमहत्त्वाच्या कारणांसाठी काही जणांना अटींसह प्रवासाची परवानगी देत आहे. मात्र आता प्रवासाच्या परवानगीसाठी ७० हजार अर्ज आल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सरकार यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल.

दरम्यान, देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक वगळता सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक लोक आहे त्या ठिकाणीच अडकले. काहींच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे तर काहींची आपल्या मुला-बाळांपासून ताटातूट झाली. शाळांच्या परीक्षा रद्द झाल्याने अनेकांनी आपल्या मुला-बाळांना गावाला पाठवलं होतं. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनबाबत नागरिकांची अजिबात तयारी नव्हती. त्यामुळे बरेच लोक आहे तिथेच अडकले.

राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी द्यावी, यासाठी तब्बल ७० हजार अर्ज पोलिसांकडे आले आहेत. यावर पोलिस यंत्रणा काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे. आधीच पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. प्रत्येक जिल्ह्यात यंत्रणा व्यवस्थित चालवण्यासाठी आपला जीव देखील धोक्यात टाकत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा