पुणे, १९ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात रोज गुन्हे घडत आहेत. गेल्या काही महिन्यात गुन्हेगारी विश्वात गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे आणि त्यातही बलात्काराच्या घटनेत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. या सर्वांसाठी राज्याचे पोलिस २४ तास कार्यरत आहेत. मात्र, या वेळी गुन्हा हा कुणी गुन्हेगाराने केला नसून खुद्द कायद्याच्या रक्षकांंनचे केला आहे.
पुण्यात कायद्यचा रक्षकच भक्षक झाला आहे. एका पोलिस हवालदाराने एका महिलेला जबरदस्तीने फ्लॅटवर घेऊन जाऊन तिच्या बरोबर शारिरीक संबध प्रस्थापित केले आणि वर त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तो यावरच न थांबता महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या कडून पैसे देखील उकाळू लागला होता.
या घटनेची चौकशी केली असता पुण्यातील तो हवालदार दोषी आढळला. या प्रकरणात तो दोषी आढळल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच बेशिस्त, बेफिकीर, बेजबाबदार, हलगर्जीपणा, विपर्यास्त, अशोभनीय व विकृत वर्तन अशी प्रतिमा व पोलिस खात्यास मलीन करण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
या आधीच राज्यातील पोलिसांची सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणात प्रतिमा मलिन होताना दिसत आहे तर आता अशा पोलिसांच्या या वर्तनामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा कुठेतरी कमी होईल आशी स्थिती निर्माण झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी