राक्षेवाडी कंटेन्मेंट तर राजगुरूनगर बफर झोन

राजगुरूनगर, दि.१६ मे २०२०: राक्षेवाडीत कोरोना बाधित व्यक्ती आढळुन आल्यावर आज(शनिवार) पासुन राक्षेवाडीसह लगत असलेले राजगुरूनगर नगरपरिषदचे दोन वार्ड कंटेन्मेंट (संक्रमनशील) तर राजगुरूनगर शहर बफर झोन करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.

याबाबत माहिती देताना तेली म्हणाले की, रक्षेवाडीत एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. त्यांच्या संपर्कात ११जण हायरिस्क असुन त्यांतील ५ जण जहांगीर तर ६ जण औंध रुग्णालयात दाखल केले आहेत.
बाधित व्यक्तीची पत्नी, त्यांची २ व भावाचा एक अशी तीन लहान मुले, भाऊभावजय, आई, वडील केस कटिंगवाला व डॉक्टर यांचा समावेश आहे.
याशिवाय पत्नी निमगाव येथील एका कंपनीत नोकरी करते. या कंपनीतील २९ महिलापैकी ५ सहकारी कामगार महिला आणि त्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या २२ फ्लॅट मधील ८७ जणांना त्यांच्या राहत्या घरी होम क्वारंटीन केले आहे. संबंधित कंपनी गुरुवारी रात्रीपासून पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे.
रुग्ण आढळुन आल्याने पुणे नाशिक महामार्गच्या पूर्वेकडे राक्षेवाडी व नगरपरिषदचे दोन वार्ड हा परिसर बफर झोन करण्यात आला आहे.या भागात नागरिकांना ये जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

येथे कोणत्याही दुकानांना उघडण्यास सक्त मनाई आहे. फक्त होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या परिसरातील तीन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
राजगुरूनगर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता पुढील तीन दिवस सर्व दुकाने बंद राहतील. तर भाजी बाजार सह अत्यावश्यक सेवांसाठी उद्यापासून सकाळी ७ ते ७ ही वेळ आहे.
तीन दिवस इतर सर्व दुकाने बंद राहतील.
आमदार दिलीप मोहिते पाटील, विभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे,तहसीलदार सुचित्रा आमले,पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, राजगुरूनगर नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यावेळी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – सुनिल थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा