रामदास महाराज जाधव कैकाडी यांचे कोरोनामुळे निधन

11

पंढरपुर, २६ सप्टेंबर २०२० : संत गाडगेबाबांचे पुतणे व शिष्य ह भ प रामदास महाराज जाधव कैकाडी यांचे कोरोनामुळे शुक्रवारी दि २५ सप्टेंबर रोजी अकलुज येथे दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

संत कैकाडी महाराज आणि त्यांचे धाकटे बंधू ह भ प कोंडीराम काका यांनी पंढरपुरात सहस्त्रनाम झोपडी सारखी भव्य ईमारत उभी करून हिंदू धर्मातील साधु संतांची महती जगासमोर अत्यंत आकर्षक स्वरूपात मांडली.

रामदास महाराज हे कट्टर वारकरी होते त्यांनी अध्यात्माबरोबरच सामाजिक कामातही रस घेतला होता युवकांना बरोबर घेवून ते गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार करीत होते. तुकाराम बीजे दिवशी त्यांनी पंढरपुर ते देहू अशी दिंडी सुरू केली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा