छत्रपती संभाजीनगर मधिल वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांचा मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा

छत्रपती संभाजीनगर, वैजापूर ३१ ऑक्टोबर २०२३ : वैजापूर तालुक्याचे आमदार व शिंदे गटात चांगले वजन असलेले आमदार रमेश बोरणारे यांनीं, मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केलाय. शिंदे गटाचे आमदार म्हणून आमदार बोरणारे यांची ओळख असुन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असलेले ते नेते आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आमदाराने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली असुन याविषयी संशय व्यक्त करण्यात येतोय.

बोरनारेंनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने, सरकार अपयशी ठरतय का? असा सूर लोकांमधून निघत आहे. काही दिवसा पूर्वीच आमदार बोरनारे यांच्या गाडीला कन्नड येथील मराठा समन्वयकांनी घेराव घातला होता. त्यावेळी आरक्षणाच्या संदर्भात आंदोलकांनी विचारणा केली असता तसेच तुम्ही राजीनामा का देत नाही असा प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री महोदय यांनी आरक्षणाबद्दल महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि लवकरच टिकणारे आरक्षण मिळेल असे त्यांनी सांगितले होते. परंतु त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा हा कुठेतरी संभ्रम निर्माण करण्यात किंवा सरकार अपयशी ठरत असल्याचे संकेत तर देत नाही ना, अशी सर्वत्र चर्चा होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रवींद्र खरात

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा