गोल पोस्ट महाराष्ट्र शाळेच्या अंगणात वृक्षारोपण करून रमेश पाटील यांनी केला वाढदिवस साजरा

शाळेच्या अंगणात वृक्षारोपण करून रमेश पाटील यांनी केला वाढदिवस साजरा

माढा, २८ ऑक्टोबर २०२०: उजनी तालुका माढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

रमेश पाटील यांच्या प्रत्येक वाढदिवसाला वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. शालेय विद्यार्थांना शालेय शिक्षण साहित्य, गणवेश वाटप, खाऊ वाटप, शालेय साहित्य, क्रिडा साहित्य वाटप, रक्तदान शिबीर असे उपक्रम प्रत्येक वर्षी राबविले जातात. परंतू चालू वर्षी कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे शाळा बंद आहेत. यामुळे मोठमोठी फळांची झाडे व सावली देणारी अशी दिड हजार रुपये किमतीचे एक झाड अशी २५ मोठी झाडे ३८००० रूपये किमतीची लावण्यात आली आहे. जेणेकरून लगेच फळ व सावली मिळेल हा उद्देश रमेश पाटील यांनी ठेवूनच हे वृक्षारोपण शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी माढा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रमेश पाटील, उजनीचे सरपंच संंतोष मेटे, उपसरपंच सतीश पाटील, ग्रा. पं सदस्य बाळासाहेब पाटील, मल्हारी गवळी, धनाजी मुरकुटे, जालिंदर मेटे, अशोक स्वामी, संतोष पाटील, निलेश मेटे, कल्याण गायकवाड, किरण मोरे, संतोष पाणबुडे, राहुल मेटे, आनंद पानबुडे, अनिल मेटे, नानासाहेब मेटे, मारूती शेळके, नाना शेळके, संदीप पाटील, सोनबा वायकर, विठोबा गवळी, शंकर घनवट आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version