उस्मानाबाद :सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात संचारबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यातच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच अर्चना दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर ग्रामपंचतीच्या वतीने संपूर्ण गावात सॅनिटायझर युक्त फवारणी करण्यात आली.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी त्यांनी गावातला बाहेर नाही आणि बाहेरचा तपासल्या शिवाय गावात नाही, अशी भूमिका घेतली. गावातच स्वयंसेवक निवडुन, गावात लागणारे जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता गावातच केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच मतदार संघातील माजी जलसंधारण मंत्री आमदार सावंत यांनी कोरोनावर मात करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावात घरोघरी जाऊन मास्क वाटप तसेच सँनिटायजर वाटप केले जात आहे.
भुम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक खणाळ यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले .