अमरावती १७ जुलै २०२४ : अमरावतीमधील रामगाव गावकऱ्यांनी रस्त्यासाठी स्वराज्य सामाजिक संघटने सोबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिकारी आणि लोक प्रतिनिधींना गावबंदी करू असा इशारा देण्यात आलाय.
गेल्या पाच ते सहा वर्षापासुन रहाटगांव ते रामगांव हा ३ कि.मी.चा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर एक ते दीड इंच फुट गड्डे पडले असून नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय. रामगांव येथील शाळकरी विद्यार्थ्यांना अमरावती येथे शिक्षण घेण्याकरीता याच मार्गे यावे लागते. या रस्त्यावर अपघात सुध्दा झाले असून अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या पावसाळा चालू असून या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने परिस्थिती अजूनच वाईट झालीय.
या रस्त्याबाबत अनेकदा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला गावकऱ्यांनी माहिती दिली असतांनीही हा रस्ता बनविण्यात आलेला नाही. या गावात फार मोठ्या प्रमाणात बौध्द लोकं असल्याकारणाने आमच्या जातीचा लोकप्रतिनिधींना तिरस्कार तर वाटत नाही ना, अशी भावना गावकऱ्यांच्या मनात आहे. जर तातडीने हा रस्ता बनविला नाही, तर संपूर्ण गांव, गावातील लोकं, शाळकरी विद्यार्थी, महिला व भगिनी जि. प. कार्यालयात राहुटी आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संघटनेच्या अमोल इंगळे यांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : सागर डोंगरे