गोल पोस्ट इतर रामपूरमध्ये जुळले २०वर्षाच्या तरुणाचे ६० वर्षाच्या वृद्धेसोबत सूत

रामपूरमध्ये जुळले २०वर्षाच्या तरुणाचे ६० वर्षाच्या वृद्धेसोबत सूत

उत्तरप्रदेश (वृत्तसंस्था):  सध्या उत्तर प्रदेशातील रामपुरमध्ये एका लग्नाची गोष्ट खुपच चर्चेत आहे. २० वर्षांचा तरूण ६० वर्षांच्या विधवा महिलेच्या प्रेमात कसा पडला, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. याबाबत अधिक माहिती अशी मिळाली की, हे दोघेजण प्रथम फोनवर बोलत होते. नंतर ते दोघे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनही एकमेकांशी बोलत होते. आता दोघेही सात जन्माचे फेरे घेऊन विवाह बंधनात अडकले आहेत.अशी माहिती समोर आली आहे.

हे आगळेवेगळे प्रेमप्रकरण उत्तर प्रदेशातील रामपुर जिल्ह्यातील अजीमनगर मतदार संघातील जटपुरा गावात घडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी जटपुरा गावात राहणार्‍या ६० वर्षांच्या केसरवतीला तिच्या मोबाइलवर एक मोबाइल नंबर मिळाला. हा नंबर हरदोई येथे राहणार्‍या २० वर्षीय राकेश पाल या तरूणाचा होता. केसरवतीने या क्रमांकावर फोन लावला आणि त्याच्याशी बोलली. त्यानंतर दोघांची बातचीत सुरू झाली. दोघे एकमेकांसोबत चॅटसुद्धा करत होते. नंतर दोघांमध्ये रोजच्या रोज बोलणे होऊ लागले. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

२० वर्षांच्या राकेशने पुढाकार घेऊन प्रथम केसरवतीकडे आपले प्रेम व्यक्त केले आणि नंतर लग्नासाठी तिला विचारले. यानंतर दोघांनी आयुष्याचे साथीदार होण्याचा निर्णय घेतला. शनिवारी हरदोईचा राकेश पाल रामपुरच्या जटपुरा गावात आपल्या प्रेयसीच्या घरी पोहोचला. येथे दोघांनी लग्न केले आणि आयुष्यभराच्या विवाह बंधनात दोघे अडकले. सध्या या लग्नाची चर्चा रामपुरमध्ये सर्वत्र रंगली आहे. त्यामुळे हे लग्न सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version