रणबीर कपूर हा कपूर कुटुंबातील पहिला मुलगा जो झाला 10वी उत्तीर्ण

पुणे, 11 जुलै 2022: रणबीर कपूर लवकरच त्याच्या ‘शमशेरा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही रणबीर जोरात काम करत आहे. आता एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने खुलासा केला आहे की, तो कपूर कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे, जो 10वी पास झाला आहे. तसंच, यावर घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, हेही सांगितलं.

रणबीर अभ्यासात कमजोर होता

कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक आहे. कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत. कपूर कुटुंबीय अभिनयात कमालीचे असले तरी अभ्यासात कधीच पुढे नव्हते हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशा परिस्थितीत रणबीरने सांगितलं की, तोही अभ्यासात कमकुवत असायचा. मात्र दहावीत कमी गुण मिळूनही त्यांचं कुटुंब खूप आनंदी होतं.

रणबीर कपूरने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं. रणबीरला विचारण्यात आलं की त्याने दहावीनंतर गणित किंवा विज्ञान यापैकी कोणता विषय निवडला होता. अभिनेत्याने सांगितलं की त्याने अकाउंट्स निवडलं होतं. यावर त्याला विचारण्यात आलं की, तो अभ्यासात कमकुवत आहे का? रणबीर म्हणाला – खूप कमजोर होतो.

10वी मध्ये मिळाले होते इतके टक्के

रणबीर कपूरने सांगितलं की, तो दहावीत 53.4 टक्के गुण मिळवून पास झाला होता. तो म्हणाला, ‘जेव्हा माझा निकाल आला तेव्हा माझे कुटुंब खूप आनंदी होतं. त्यांनी माझ्यासाठी पार्टी आयोजित केली होती. त्यांना कोणतीही आशा उरली नव्हती. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला मी माझ्या कुटुंबातील पहिला मुलगा होतो. यावर रणबीरला सांगण्यात आलं की, तो अभ्यासात कमकुवत असला तरी तो अभिनयात उत्कृष्ट आहे.

यापूर्वी 2017 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने स्वत:ला कुटुंबातील सर्वात शिक्षित सदस्य असल्याचं सांगितलं होतं. रणबीर म्हणाला होता, ‘माझा कौटुंबिक इतिहास फारसा चांगला नाही. माझे वडील 8वीत नापास झाले. माझे काका 9व्या वर्गात आणि आजोबा सहाव्या वर्गात. खरं तर मी माझ्या कुटुंबातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती आहे.

शालेय शिक्षण संपल्यानंतर रणबीर कपूरने अभिनयाला सुरुवात केली. 2007 मध्ये त्यांने इंडस्ट्रीत प्रवेश केला. लवकरच रणबीर ‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत वाणी कपूर आणि संजय दत्त असणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा