रंगभूमीवरचा नटसम्राट ‘डॉ.श्रीराम लागू’

चित्रपट सृष्टीचे सुवर्ण पान, आणि मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते असे दिग्गज कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा प्रवास… कसा होता ते जाणून घेऊ

डॉ.श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 सातारा येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू असे आहे. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे विशेष ओढा होता. पुण्यातील पी. डी. ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली.1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानियायेथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसायात जम बसत असतानाही केवळ नाटकाच्या ओढीने कलावंत म्हणून केलेले काम डॉक्टरेट मिळविण्याइतके महत्त्वाचे आहे. पी.डी.ए, रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदू, रूपवेध, आविष्कार, आय.एन.टी. ह्या मान्यवर नाट्यसंस्थांच्या नाटकातून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला.

अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणाक्य विष्णुगुप्त, किरवंत इत्यादी. कांती मडिया या अनुवादित गुजराथी नाटकांचा समावेश आहे.

1. ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावली’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘मित्र’ अशा नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

2. ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहेत आणि राहतील.

3. मराठीत काम करताना हिंदीतही श्रीराम लागूंनी अभिनयाच्या उंचीने चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली.

4. डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे ‘रूपवेध’ हे पुस्तक आहे. तसेच “लमाण” हे त्यांनी लिहीलेले स्वतःचे आत्मचरित्र आहे.

5. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, जीवनगौरव तसेच भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरविले गेले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा