रणजी ट्रॉफीत हिमाचलची तामिळनाडूला धोबीपछाड

11

नवी दिल्ली: रणजी चषक लढतीत तामिळनाडूचा ७१ धावांनी पराभव करत हिमाचल प्रदेशने विजय मिळवला आहे. यासह हिमाचलच्या खात्यात ६ गुण जमा झाले आहेत.

प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या तामिळनाडूच्या आर. आश्विनने ५ तर आर. किशोरने ३ गडी बाद केले.
हिमाचल प्रदेशने आकाश वशिष्ठच्या ३५, मयंक डागरच्या ३३ आणि एसएल वर्माच्या ३० धावांच्या खेळीवर पहिल्या डावात सर्वबाद १५८ धावा केल्या.
नंतर वैभव अरोराच्या ३ तर मयंक डागर, आर धवन आणि आकाश वसिष्ठच्या प्रत्येकी 2 बळीच्या जोरावर हिमाचलने तामिळनाडूचा पहिला डाव ९६ वर गुंडाळत ६२ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात तामिळनाडूने हिमाचलला १५४ धावांवर रोखले. पहिल्या डावातील६२ धावांच्या आघाडीसह तामिळनाडूला २१७ धावांचे आव्हान मिळाले.
विजयासाठी २१७ धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूचा संघ६७.५ षटकांत १४५ धावांत गारद झाला. यात हिमाचलचा फिरकीपटू आकाश वसिष्टच्या गोलंदाजीने महत्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, हिमाचलचा फिरकीपटू आकाश वसिष्ठ हा सामन्याचा मानकरी ठरला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा