परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई, २३ जुलै २०२१: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये डीसीपी अकबर पठाण यांचाही समावेश आहे. श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परमबीर यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे. केस मागे घेण्यासाठी बिल्डरकडून खंडणी मागितल्याची आरोप परमबीर सिंग, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलिसांवर आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा