गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा रणविरच्या ‘८३’चा फस्ट लूक प्रदर्शित

रणविरच्या ‘८३’चा फस्ट लूक प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा ‘८३′ चित्रपटातील फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. रणवीर सिंगचा हा लूक म्हणजे तरुणपणातील कपिल देव आणि रोमी देव यांसारख्या दिसत आहे. सिनेसमीक्षक रमेश बाला यांनी ट्‌विटरवरून हा फोटो शेअर केला.

या चित्रपटात दीपिका पादुकोण ही रोमी देव आणि रणवीर सिंह हा कपिल देव यांच्या लूकमध्ये दिसत आहेत. हा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.
यात दीपिका पादुकोण ही रोमी देवप्रमाणे लहान केसांमध्ये दिसत आहे. याबाबत दीपिका पादूकोणने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.
खेळाच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एक क्षण असलेल्या चित्रपटात एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणे नक्कीच गौरवास्पद आहे.पतीच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत आकांक्षांच्या यशासाठी पत्नी किती महत्त्वाची भूमिका निभावत असते, हे मी माझ्या आईच्या रूपात खूप जवळून पाहिले आहे. माझ्यासाठी अनेक प्रकारे ’83′ त्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे, जी आपल्या पतीच्या स्वप्नांना आपल्या स्वप्नांच्या पुढे ठेवते.

error: Content is protected !!
Exit mobile version