रावसाहेब दादा पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा १००% निकाल

4

वाघोली, दि. १८ जुलै २०२०: हवेली तालुक्यातील रावसाहेब नगर, न्हावरे येथील सीबीएससी बोर्ड दहावीच्या वर्गातील यशस्वी प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा आज शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार, व माजी सभापती सुजाता पवार, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रावसाहेब दादा पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १००% लागल्याबद्दल आमदार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

रावसाहेब दादा पवार इंग्लिश मीडियम स्कूल मधील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी-

प्रथम क्रमांक- कु. भाग्यश्री विजय परभाने, वडगाव रासाई ९५.२०%

द्वितीय क्रमांक- कु. राजनंदिनी रामदास दौंडकर, दहिवडी. ८९.८%

तृतीय क्रमांक- कु. अविष्कार विजय परभाणे, वडगाव रासाई, ८६.६%

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्थानिक पातळीवर नागरिकांनी व पदाधिकारी शाळेवर प्रेम करणा-यांनी अभिनंदन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा