सोयगाव, छत्रपती संभाजीनगर २९ एप्रिल २०२४ : लोकसभा २०२४ निवडणूकीसाठी सहाव्यांदा जालना मतदार संघातून रावसाहेब दानवे यांना भाजपकडून संधी देण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत शिंदे गट असून सोयगाव-सिल्लोड मतदार संघातुन मंत्री अब्दुल सत्तार यांची त्यांना साथ मिळणार आहे. मात्र सोयगाव शहरासह ग्रामीण भागातून दानवे यांच्या विषयी नाराजी दिसून येतेय. याचाच प्रत्यय आज रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेला जरंडी येथे दिसून आला. जरंडी येथे दानवे यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची देखील सभेला उपस्थिती होते. दानवे यांच्या प्रचार सभेला अवघ्या दीडशे ते दोनशे लोकांची उपस्थिती दिसुन आली. यावेळी दानवे आणि सत्तारांच्या ताफ्यातील लोकांचीच संख्या जास्त दिसून आली.
दरम्यान अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना रावसाहेब दानवे यांना निवडून देण्याची केविलवाणी साद घातली. रावसाहेब दानवे यांनी बोलताना सांगितले की, मला पुन्हा सहाव्यांदा निवडून द्यावे, मी सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असेन. जालना मतदार संघातील सोयगाव सर्कल मधील जनतेच्या मनात रावसाहेब दानवे यांच्या बद्दल रोष असल्याचे बोलल जात असताना, २५ वर्षात एकदाही लोकसभा निवडणूक प्रचार सभा न घेतलेल्या रावसाहेब दानवे यांना, लोकसभा २०२४ साठी अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने सोयगाव तालुक्यात सभा घ्यावी लागली.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी