उत्तर प्रदेश राज्यात बलात्कार आणि खुनांमध्ये घट पण गुन्हेगारांचं प्रमाण देशात सर्वात जास्त!

उत्तर प्रदेश, ३१ ऑगस्ट २०२२: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने मंगळवारी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली आहे. पण देशभरात या गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश आता बलात्काराच्या गुन्ह्यां मध्ये २३ व्या तर खुनाच्या गुन्ह्यांबाबतीत २४ व्या क्रमांकावर आहे.

उत्तर प्रदेशात २०२१ मध्ये बलात्काराचे २,८४५ गुन्हे नोंदवण्यात आले तर खुनाचे ३,७१७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. लहान मुलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश २८ व्या क्रमांकावर असून गेल्या वर्षी १६ हजार ८३८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या महिला आणि लहान मुलांसंदर्भातल्या गुन्ह्यांमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अनुक्रमे ६.२ आणि ११.११ टक्क्यांची घट झाली आहे. तर खंडणीसाठी अपहरण या बाबतीत युपी राज्य देशात ३६ व्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ने दिलेल्या अहवाल मध्ये २०२१ साली नमूद करण्यात आलं आहे की देशातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातले गुन्हेगारांच दोषी ठरण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा