गोल पोस्ट गुन्हा चालत्या कारमध्ये बलात्कार, नंतर हाॅटेलमधे नेऊन पुन्हा बलात्कार

चालत्या कारमध्ये बलात्कार, नंतर हाॅटेलमधे नेऊन पुन्हा बलात्कार

ग्वाल्हेर, २४ फेब्रुवरी २०२१: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये चालत्या कारच्या आत एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेचा आरोप आहे की एका व्यक्तीने तिला कारखान्यात काम करण्याच्या बाहनाने तिला कारमध्ये बसवले आणि फिरत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक आणि आरोपीला अटक केली आहे.

कुलथ येथे राहण्यार्या एका महिलेने मुरैना येथील रामबाबू गुर्जर याने तिच्यावर चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. नोकरीच्या बहाण्याने आरोपींनी तिला बहोदापूर येथून आपल्या गाडीत बसवले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

यानंतर प्राणिसंग्रहालयाजवळील मोती तबेला येथे त्यांनी तिच्याबरोबर फिरत्या कारमध्ये चुकीचे काम केल्याचा आरोप केला. त्याच वेळी, त्याच्या ड्रायव्हरने कार थांबविली नाही आणि त्याने या दुष्कर्मात आरोपीला मदत केल्याची तक्रार महिलेनं केली आहे.

आरोपीच्या तावडीतून बाहेर निसटल्या बरोबर महिलेने पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार केली. पोलिस याबाबत कार्यवाही करत पोलिसांनी आरोपी रामबाबू गुर्जर आणि त्याच्या ड्रायव्हरला अटक केली. डीएसपी क्राइम ब्रांच विजया भदौरिया यांनी सांगितले की, एका महिलेने सोमवारी कारमधे तिच्यावर बलात्कार केल्याची नोंद केली आणि त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्येही तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version