कर्जत, दि. १६ जुलै २०२०: कर्जत तालुक्यातील आखोणी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर कारमध्ये बलात्कार केला गेल्याची घटना घडली आहे. कार मधील निवृत्ती सुभाष ढवळे, कारचालक आणि मेजर (दोघांची नावे माहित नाहीत) यांनी या तरुणीस काष्टी येथे उतरु न देता तिला कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील निर्जनस्थानी आडरानात जंगल परिसरात नेले आणि बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील आखोनी येथे राहणा-या २५ वर्षीय तरुणीला पांढरीपूल येथून या तरूणांनी कारमध्ये बसवले आणि काष्टी येथे उतरून देऊ, असे सांगितले. पण काष्टी आल्यानंतरही त्या तरूणीला गाडीतून उतरून न देता श्रीगोंदा तालुक्यातून कर्जत तालुक्यातील सिध्दटेक या ठिकाणी आणण्यात आले. हा परिसर अतिशय दाट झुडपाचा आणि जंगल परिसर असल्याने या ठिकाणी कोणीही येणार नाही असे लक्षात घेऊन या तरूणीवर त्या नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
आरोपी निवृत्ती सुभाष ढवळे याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. कारचालक आणि मेजर यांनी आरोपीच्या अत्याचाराचा विरोध न करता त्याला सहाय्यच केले. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, काल या पिडीत तरुणीने याप्रकरणी कर्जत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार निवृत्ती सुभाष ढवळे, कार चालक आणि मेजर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत विभागाचे डिवायएसपी संजय सातव, पो. नि. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ढवळे याला अटक केले असून पुढील तपास डिवायएसपी संजय सातव हे करीत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष