आजचे राशिभविष्य

मेष : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २ राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. व्यवसायाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. विवाहेच्छूकांचे एखाद्या समारंभात सूत जुळू शकेल.

वृषभ: शुभ रंग : नारिंगी | अंक : ७ अधिकारी वर्गाकडून त्रास संभवतो. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. आज मित्रांच्या फार नादी लागूच नका.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ३ नोकरीच्या ठीकाणी कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. घरात आज वडीलधाऱी मंडळीही आपल्याच मतावर अडून बसणार आहेत. एकांत हवासा वाटेल.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ उद्योग व्यवसायात अडचणींना तोड द्यावे लागेल. नोकरीत साहेबांचे समाधान होणे केवळ अशक्य. जोडीदारही माझेच खरे म्हणेल. संयमाची गरज आहे.

सिंह : शुभ रंग : तांबडा| अंक : २ तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल. तुमच्यातील नेतृत्वगुणांस वाव मिळेल.जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४ आजचा दिवस फक्त कर्म करण्याचा. फळ उशिराने का होईना मिळणारच आहे. हितशत्रू सक्रिय असताना भावी उपक्रम आत्ताच उघड करू नका. तंदुरुस्ती महत्वाची.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : १ सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, मुलांची खेळणी वगैरे व्यवसाय तेजीत चालतील. कलाक्रिडा क्षेत्रातल्या मंडळींना उत्तम संधी मिळतील. हौसमौज कराल.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ८ मुलांची शैक्षणिक प्रगती उत्तम राहील. तुमचे मनोबल चांगले असेल. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. कलाकारांनी प्रयत्न वाढवावेत.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉॅबेरी | अंक : ९ आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा अन्यथा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग : मरून | अंक : ५ राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र पैशाची कमतरता भासू देणार नाही. आज वाणीतील गाेडवा कामी येईल. नवविवाहितांची स्वप्नपूर्ती होईल.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८ कार्यक्षेत्रात अनुभवी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. ध्येयाच्या दिशेने वाटचाल कराल. वेळेचे योग्य नियोजन कामी येणार आहे.

मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : ६ नोकरी व्यवसायात आज कायद्याची चौकट मोडून चालणार नाही. घरात थाेर मंडळी काही उपदेशांचे डोस पाजतील. प्रवासात सावध रहा. खर्चात कपात गरजेची.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा