राशिभविष्य

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. आज प्रक़ृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे.


वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ५ कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.


मिथुन : शुभ रंग : लाल | अंक : २ अार्थिक बाजू उत्तम असेल. घरसजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल.वाहनाचीही काळजी घ्यावी लागेल.


कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ६ काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. काही कारणास्तव प्रवास घडतील. .


सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७ आत्मविश्वासाने नव्या योजना राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. गरजूंना मदत कराल स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल.


कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ३ कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील.


तूळ : शुभ रंग : हिरवा | अंक : ४ आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.विदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होणार आहेत.


वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६ बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या वाहनाच्या चाव्या मिळण्याचे योग अहेत.


धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९ आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळीं बरोबर मात्र काहीतरी बिनसणार अाहे.


मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : १ घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा व्यर्थ खटाटोप न करता, त्यांच्या वयाचा मान राखा.


कुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८ आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.


मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : २ आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा