राशिभविष्य

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक :२

व्यावसायिकांना व्यापार वृध्दीसाठी प्रवास करावे लागतील. नोकरदारांना साहेबांना खूष करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. दानधर्म कराल.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३

कार्यक्षेत्रात थोड्याफार अडचणींचा सामना करावा लागेल. भागिदारी व्यवसायात काही मतभेद संभवतात.आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा व वाहन हळू चालवा.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

महत्वाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. योग्यवेळी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तु म्हणशील तसंच या धोरणाने वैवाहीक जिवनांतील आनंद वाढेल.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २

कार्यक्षेत्रात प्रगती पथावरुन तुमची वाटचाल सुरू आहे. हितशत्रूंवर मात्र नजर ठेवा. आज दुपारनंतर जरा तब्येत नरम राहील. योग्य सल्ला घ्या.

सिंह : शुभ रंग : तांबूस | अंक : १ खिसे भरलेले असतील तरी दुपारनंतर रिकामे व्हायला वेळ लागणार नाही. आवक पुरेशी असली तरही खर्चावर ताबा गरजेचा आहे. आज प्रिय मित्रांचा सहवास लाभेल.

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९

काही कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी वेळ काढाल.आज प्रिय व्यक्तीस दिलेला शब्द पाळावा लागेल. आज मुलांचेही लाड आनंदाने पुरवाल. छान दिवस.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७

व्यावसायिक उद्दीष्ठे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. योग्य जाहिरातीवरही लक्ष देणे गरजेचे. गप्पांत वेळ दवडून चालणार नाही.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

काही अनुकूल घटनांनी तुमचं मनोबल वाढेल.काही अनपेक्षित लाभ होतील. नेते मंडळींची भाषणे प्रभावी होतील. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवलेले बरे.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ४

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. सभासंमेलनात तुमचे वक्तृत्व प्रभावी होईल. आज वादविदात स्वत:च्या मताशी ठाम रहाल.

मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ५

आर्थिक प्रश्न थोडे बिकट होण्याची शक्यता आहे. दूरचे नातलग संपर्कात येतील. आपल्या स्पष्टवक्तेपणा मुळे कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. अधिकार वापरताना संकोच बाळगू नये.

मीन : शुभ रंग : पिवळा | अंक : ३

आज तुम्हाला निस्वार्थीपणे काही कंटाळवाणी कामेही करावी लागणार आहेत. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. काही प्रसंगी अहंकाराची बाधा होऊ शकते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा