राशिभविष्य

मेष: शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५ काही मनाविरूध्द घटना घडल्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कर्जमंजूरीची कामे लांबतील. कायद्यात रहाल तरच फयद्यात रहाल.


वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४ वादविवादात समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा हुषार असूही शकते याचे भान असूद्या. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे आज गरजेचे. पत्नीस दिलेली वचने पाळणे हिताचे.


मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ नोकरीच्या ठीकाणी आज वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. महत्वाकांक्षांना आवर घालून थोडे विश्रांतीस प्राधान्य देणेही गरजेचे आहे. काही येणी वसूल होतील.


कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : २ आज ऐषआरामासाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आज जास्तीत जास्त वेळ घालवाल. खेळाडू व कलाकार मंडळींना चाहत्यांचे प्रेम लाभेल.


सिंह : शुभ रंग : मरून| अंक : ४ आज काही कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. गृहीणींनी गप्पा आवरत्या घ्याव्यात कारण त्यातून गैरसमज होतील.


कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६ आज दैनंदीन कामातही अडथळे संभवतात. घरात पुरेसा वेळ न दिल्याने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. शेजारी आपलेपणाने वागतील. व्यस्त दिवस.


तूळ : शुभ रंग : लेमन| अंक : ३ व्यवसायात आवक मनाजोगती असल्याने तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. गृहीणी आज घरी येणाऱ्या पाहुण्यांची आनंदाने उठबस करतील. आनंदी दिवस.


वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ७ अनावश्यक खर्च कमी करून काही गुंतवणूक करण्याकडे तुमचा कल राहील. गुंतवणूक करताना मात्र झटपट लाभाचा मोह टाळलेला बरा. पायपीट होणार आहे.


धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : २ कंजूषपणा सोडावा लागेल. आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही कर्जहप्ते फेडावे लागणार आहेत. बेरोजगारांची भटकंती चालूच राहणार आहे.


मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९ अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्य सामंजस्याने वागतील. वास्तु किंवा वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील.


कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८ रिकाम्या गप्पांत वेळ न दवडता आज तुम्हाला कृतीस प्राधान्य द्यावे लागणार आहे. उच्चपदस्थांच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. अत्यंत व्यस्त दिवस.


मीन : शुभ रंग : निळा | अंक : १ कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचे दडपण येईल. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती अध्यात्मिक होतील. संध्याकाळी सत्संगाकडे पाय आपोआप वळतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा