राशिन दि. २१.मे.२०२०: प्रशासनाच्या आदेशानंतर राशिन परिसरात सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करी आहेत. मात्र हे करत असताना सोशल डिस्टस्टिंगचे कोणतेही पालन होताना दिसत नाही.
अहमदनगर जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने बऱ्याच प्रमाणावर या भागात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील राशिन हे महत्वाचे गांव आहे. आणि सर्व सुविधा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी करण्यासाठी गर्दी होतं असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र या ठिकाणी कोणतेही शासकीय नियमांचे पालन होताना दिसत नाही. कुठलाही नागरिक मास्कचा वापर करताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे सर्व दुकानदार हे कोरोनाच्या भितीमुळे धास्तावलेले आहे. नागरिकांना कोरोनाचे अजिबात गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहे. नियमांचे पालन करायचे नसेल तर शिथिलता देऊन करायचे काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष