राशिनचा ‘तो’ रूग्ण निघाला निगेटिव्ह

5

राशिन.१४ मे २०२०: काही दिवसांपूर्वी राशिन येथील एका रूग्णास सर्दी खोकला आणि घशाची समस्या होत असल्याचे जाणवले होते. त्याला तातडीने राशिन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालय प्रशासनाने त्या व्यक्तीला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील राशिन म्हणजे महत्वाचे शहर. या ठिकाणी व्यापारी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ते जीव मुठीत घेऊन जगत होते. या सर्व गोष्टीचा परिणाम हा राशिन आणि परिसरात पसरलेला पाहण्यास मिळत होता. पण त्या व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता चाचणी घेतल्यावर असे निदर्शनास आले कि ती व्यक्ती , ही कोरोना निगेटिव्ह आहे. त्यामुळे राशिन आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा