नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डीपी त्रिपाठी (वय ६७) यांचे निधन झाले. दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तेव्हा त्रिपाठी यांनी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा देऊन ते राष्ट्रवादीत सामील झाले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादी सोबत होते.