मुंबई : आज देशातील ० – ६ वर्ष या वयोगोटातील बालकांमधील प्रत्येक हजार मुलांमागे असलेल्या मुलींच्या जन्मदराचे म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर प्रमाण प्रमाण १९६१ मध्ये असलेल्या प्रमाणापेक्षा दिवसेंदिवस कमी कमीच होताना दिसत आहे.
१९९१ मध्ये ९४५ तर २००१ मध्ये ९२७ आणि २०११ मध्ये ९१८ एवढा हा आश्चर्यजनक रीतीने कमी कमी होत जाणारा लिंगानुपात आहे. हा बालिका जन्मप्रमानाचा आकडा बाल लिंग गुणोत्तर असे दर्शवतो कि, समाजात बाळाच्या जन्मापूर्वी हि लिंगपरीक्षण करून घेऊन कोणत्या बाळाला जन्म घेऊ दयायचा हे ठरवले जाते.
मुलींच्या कमी होत जाणाऱ्या जन्मदराच्या समस्येत तोंड देण्यासाठी सरकारने ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ (बेटी बचाव बेटी पढाव – बीबीबीपी) हि योजना २०१४ च्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरु केली आहे. त्यासाठी कमी कमी होत जाणाऱ्या मुलींच्या जन्मदरानुसार बाल लिंग गुणोत्तर प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संपूर्ण देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून १०० जिल्हे निवडण्यात आलेले आहेत.
महिला व बालविकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन मंत्रालय या तिनही मंत्रालयांनी एकत्र येऊन हि बीबीबीपी योजना राबविण्याचे ठरविले गेले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ (मुलगी वाचवा मुलगी शिकवा) या उपक्रमाचा शुभारंभ हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये दि.२२जानेवारी २०१५ रोजी झाला.
बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते, लाडली लक्ष्मी, मुलींसाठी शाळेचा शुल्क माफ, मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत प्राधान्य, ‘सर्वांना घर’ योजनेच्या अंतर्गत अनुदान, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत विनामूल्य LPG जोडणी आणि अन्य अश्या विविध योजना राबविल्या जातात. मुलीचा जन्म आनंदाने साजरा करणे, तिचे आनंदाने स्वागत करणे व नंतर तिच्या शिक्षणाची व्यवस्था कार्यान्वित करणे.