गोल पोस्ट महाराष्ट्र रस्त्यावर असलेला खड्डा अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी बुजवला

रस्त्यावर असलेला खड्डा अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी बुजवला

टेंभुर्णी , २२ जुलै २०२० : महाराष्ट्रात भाजप ची सत्ता असताना केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपायांचा नीधी मंजूर असणाऱ्या टेंभुर्णी लक्ष्मी पार्क बायपास ते इंदापूर बायपास शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याचे भूमिपूजन चार ते पाच वर्षा आधी केले होते.

मात्र, सरकार ढासळले तरी मंजूर झालेला निधी गेला कुठे आणि काम का झाले नाही हा टेंभुर्णीकरांना प्रश्न पडला असला तरी या रस्त्याला वाली कोण ? असं म्हणायची वेळ आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, टेंभुर्णी येथील बेंबळे चौकातील रस्त्यावरील दुभाजकाजवळ पाणी साठून राहणाऱ्या एक ते दिड फुटाचा अतिशय धोकादायक असा खड्डा होता. या खड्ड्यामुळे अनेकवेळा अपघात होत होते, आणि त्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले होते.

असा हा धोकादायक खड्डा आणखीन किती जणांचे बळी घेणार ? अशी परस्थिती असताना, हायवे बांधकाम विभागाने याकडे पुर्ण दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्येकर्ते बशिर जहागिरदार यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून दगड ,खडी,वाळू ,सिमेंट यांनी रस्त्याचे काँक्रेटीकरण करुन कायमचा तो खड्डा बुजवून घेतल्याने पुढे होणारे अनेक अनर्थ टळले असून त्यांच्या या कार्याबद्दल टेंभुर्णीकर व महामार्ग प्रवाशांमधून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला दाद देत टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सोपान ढगे,सतिश चांदगुडे ,विष्णू बिचुकले ,गणेश चौगुले, यांनी त्यांचे कौतुक केले आहे .

अशा प्रकारचे सामाजिक कार्य बशिर जहागिरदार हे आपल्या आवरओन फाऊंडेशनच्या माध्यमातून नेहमीच करत असतात .

हा खड्डा बुजवण्यासाठी टेंभुर्णी येथील
बशीर जहागीरदार यांच्यासह अभिषेक शहा, संतोष सोनवणे, सागर जगताप, रमेश लोंढे, अजित जहागीरदार, रफिक शेख, राहुल तरटे, गोट्या खंदारे, नितीन धोत्रे, सोमा चव्हाण, अशोक चव्हाण, मुन्ना हारकीरे, संदीप राजगुरु, शुभम कानडे, समीर नाईकनवरे, विशाल खरात,अक्षय क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.

न्युज अनकट प्रतिनिधी :प्रदीप पाटील.

error: Content is protected !!
Exit mobile version