रतन टाटांच्या साधेपणाने जिंकली मने, सुरक्षा शिवाय नॅनोअधून केला ताज हॉटेल पर्यंत प्रवास, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, 19 मे 2022: उद्योगपती रतन टाटा यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने सर्वांना प्रभावित केले. कोणत्याही सिक्योरिटी आणि तयारी शिवाय ते मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CdqwvONqSPh/?utm_source=ig_web_button_share_sheet

नॅनो मधून आले ताज हॉटेल ला

या व्हिडिओमध्ये रतन टाटा पांढऱ्या रंगाच्या टाटा नॅनोमध्ये बसताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत फक्त शंतनू नायडू दिसत आहे. तसेच ताज हॉटेलचे कर्मचारी त्यांना निरोप देत आहेत. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष असूनही त्यांच्यासोबत ना फारशी सुरक्षा असते ना वाहनांचा ताफा.

रतन टाटा यांना टाटा नॅनो खूप आवडते. ही कार त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी टाटा नॅनोशी संबंधित एक सुंदर पोस्ट शेअर केली होती.

रतन टाटा यांना आवडते टाटा नॅनो

रतन टाटा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे – मी सतत भारतीय कुटुंबे स्कूटरवरून प्रवास करताना पाहायचो, जिथे अनेकदा एक मूल आई आणि वडील यांच्यामध्ये सँडविचसारखे बसलेले असते. कधी कधी ते धोकादायक रस्त्यावरून देखील असाच प्रवास करतात. हे मुख्य कारण होते ज्याने माझ्यात असे वाहन (नॅनो) बनवण्याची इच्छा निर्माण केली आणि मला प्रेरित केले. त्यांनी पुढे लिहिले – स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिकण्याचा फायदा झाला. मी नवीन डिझाइन्सवर काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. सुरुवातीला टू-व्हीलर सुरक्षित करण्याचा विचार होता. त्यासाठी एक डिझाईन तयार करण्यात आली होती जी 4-व्हीलर होती, पण त्याला ना दरवाजा होता, ना खिडकी. पण शेवटी मी ठरवले की ती एक कार असेल. नॅनो कार नेहमीच आपल्या सर्व लोकांसाठी बनवली गेली होती.

2008 मध्ये लॉन्च झाली टाटा नॅनो

‘कार ऑफ द कॉमन पीपल’ या नावाने प्रसिद्ध असलेली टाटा नॅनो कंपनीने 10 जानेवारी 2008 रोजी लॉन्च केली होती. त्यावेळच्या बीएस-3 मानकांनुसार तिची रचना करण्यात आली होती. ही कार 624cc 2-सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि 4-स्पीड गिअरबॉक्स सह आली. कंपनीने ती 3 व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने तिची सुरुवातीची किंमत एक लाख रुपये ठेवली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा