पेणमध्ये चाळीस हजार लाभार्थ्यांना शिधा वाटप, अंत्योदय कार्ड धारकांना लवकरच साड्यांचे वाटप

पेण, रायगड २२ फेब्रुवारी २०२३ : रास्त किमतीमध्ये आणि योग्य असे धान्य किंवा जीवनावश्यक वस्तू गोरगरीब जनतेला देण्याची सुविधा शासनाचे केली आहे. रेशानिंग दुकानांमधून शासनाच्या वतीने शिधा वाटप करण्यात येत असुन पेण तालुक्यात पुरवठा विभागाकडे आलेल्या या शिधा वाटपाच्या टप्प्यात ३९९२१ लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात येत असून जवळपास नव्वद टक्के लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात पुरवठा विभागाला यश प्राप्त झाले आहे. गौरी गणपती, दिवाळी, गुढी पाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसारख्या महत्त्वाच्या सणवारांचे औचित्य साधुन शासनाचे गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील, जीवनावश्यक वस्तू खरेदी करु शकत नाहीत अशा लोकांसाठी आधार म्हणून या शिधा वाटपाच्या कार्यक्रमाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांची, ग्राहकांची किंवा कुटुंबीयांची शासन दरबारी नोंद असते अशा लाभार्थ्यांना या शिधा वाटपाचा लाभ घेता येतो.

तळागाळातील गरीब कुटुंब तसेच आदिवासी बांधव याचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत. शिधा वाटप करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे नियोजन करणे ही एक मोठी तारेवरची कसरतच असुन ही योजना सुरळीत राबविण्यासाठी संबंधीत वस्तूंची लाभार्थ्यांच्या आकडेवारीवरून मागणी आणि पुरवठा याची योग्य ती सांगड घालावी लागते. त्यामुळे त्याचा अचुक अंदाज घेऊनच प्रत्येक लाभार्थ्याला याचा लाभ मिळेल, या दृष्टीने या जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक केली जाते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा ताळमेळ घालुन शासनाचे शिधा वाटप करण्याची एक चांगली संकल्पना मांडलीय. नागरिकांना अवघ्या शंभर रुपयांमध्ये अर्धा कीलो रवा, पोहे, मैदा, चणाडाळ, साखर आणि एक किलो तेल अशा प्रकारचा शिधा केशरी आणि पिवळ्या रंगाच्या रेशनकार्ड धारकांना वाटप करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील ३९९२१ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असुन तालुक्यांतील ११६ रेशनिंग दुकानांमार्फत आत्तापर्यंत जवळपास नव्वद टक्के लाभार्थ्यांना हा शिधा वाटप करण्यात आला असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी दिली आहे.

शासनाने १० नोव्हेंबर २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आता अंत्योदय रेशनकार्ड धारकांना प्रत्येक रेशन कार्ड मागे एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाकडून महिलांना प्राधान्य देऊन महिलांसाठी ही आणखी एक नवी पर्वणी ठरणार आहे. २६ जानेवारी ते होळी उत्सव या कालावधीत हे साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : स्वप्नील पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा