निमगाव येथे वंचित कुटूंबासाठी शरद भोजन योजनेतून रेशनिंग वाटप

राजगुरूनगर, दि. १० मे २०२०: श्री क्षेत्र निमगाव येथे शरद भोजन योजना जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत वंचित कुटुंब बाहेरगावाचे अडकलेले मजुर ज्यांचे हातावर पोट आहे अशा ४१ कुटुंबांना रेशनिंग वाटप करण्यात आले. कोठेही कुठलाही घटक उपाशी राहू नये म्हणून शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत त्यामध्ये अतितीव्र दिव्यांगासाठी शरद भोजन योजने अंतर्गत लाभ मिळालेला आहे, तसेच उर्वरित सर्व अतितीव्र दिव्यांगासाठी माहिती पाठवली आहे.

उर्वरित हातावर पोट असणारी २२ कुटुंबासाठी शाश्वत संस्था मंचर व मर्सिडिज बेंझ यांच्या सहयोगातून किराणा कीट उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचे ही वाटप करण्यात येणार आहे. यावेळी जि. प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे व मा उपसभापती दसरथ गाडे, सुखदेव पानसरे या मान्यवरांचा सन्मान मा. सरपंच बबनराव शिंदे यांनी स्वतः बनविलेले मास्क देऊन करण्यात आला.

यावेळी सरपंच सोनबा गावडे, पोलिस पाटील बाळासाहेब शिंदे, मा. सरपंच अमर शिंदे, मा. सरपंच बबनराव शिंदे, ग्रामविकास अधिकारी अमित तावरे, संतोष शिंदे, भाऊ तांबे, शुभांगीताई शिंदे, दसरथ शिंदे, भाऊ सातपुते, काळुराम वायकर व सर्व लाभार्थी उपस्थित होते. यामध्ये ग्रा. पं. प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य सेवक, आशा ताई, सेवक, सेविका, कर्मचारी वृंद, सर्व खूप परिश्रम घेत आहेत. तसेच निमगाव ( ता.खेड ) पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांचे हस्ते रेशनिंग वाटप करण्यात आले.

अनकट प्रतिनिधी- सुनिल थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा