रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची बैठक उत्साहात

रत्नागिरी, २४ जानेवारी २०२३ : ‘हाथ से हात जोडो’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहून काँग्रेस भवन कार्यालय येथे जिल्हा काँग्रेसची महत्त्वाची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या सुरवातीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवला गेला. त्यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला होता.

सदर बैठकीला प्रदेश काँग्रेसकडून समन्वयक ॲड. प्रवीण ठाकूर व रत्नागिरी निरीक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की भारत जोडो यात्रा भारतातल्या सामान्य नागरिकांना जनतेला जागरूक करण्यासाठी होती आणि त्याची समाप्ती येत्या ३० जानेवारीला काश्मीरमध्ये होणार असून, त्याची माहिती प्रत्येक घराघरांत पोचली पाहिजे. त्यासाठी काँग्रेसने ‘हाथ से हात जोडो’ याचा सिम्बॉल तयार केला असून, त्याचे परिपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची जसे की वाढती महागाई, बेरोजगारी, गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किमती यासाठी कॉंग्रेस पक्ष रस्त्यापासून ते संसदेपर्यंत प्रत्येक दिवशी या वाईट गोष्टीविरोधात लढेल. आम्ही एक असा भारत घडविण्याचा दृढ संकल्प केला आहे, की जिथे प्रत्येक भारतीयांकडे सामाजिक संपन्नतेबरोबरच आर्थिक समृद्धीची समान संधी असेल. जिथे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल, युवकांना रोजगार मिळेल, लहान आणि मध्यम वर्गातील उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, पेट्रोल, डिझेल स्वस्त असेल, रुपया डॉलरप्रमाणे मजबूत असेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांपेक्षा जास्त नसतील. सदर अभियानाचे जाहिरातचे फलक प्रत्येक तालुक्यात मुख्य ठिकाणी म्हणजे एसटी बसस्थानक, तहसीलदार कार्यालय आदी गर्दीच्या ठिकाणी लावावेत. जेणेकरून एक माहोल तयार होईल, अशी मागणी सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी आपल्या भाषणामध्ये केली.

बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ग्राहक संरक्षण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश पतियानी, अनुसूचित जाती-जमाती जिल्हाध्यक्ष रघुनाथ आडिवरेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. अश्विनी आगाशे, सुरेश कातकर, जिल्हा सरचिटणीस बंडूशेठ सावंत, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, जिल्हा सरचिटणीस अशपाक काद्री, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, युवक काँग्रेसचे चेतन नवरंगे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, रियाज ठाकूर, शहराध्यक्ष लियाकत शाह, रमेश शाह, रवी खेडेकर, खलील सुर्वे, हनिफ खलिपे, सुभाष मांडवकर, बंटी गोताड, विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर, गजानन दली आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा